Psephology
- Vivek Aware
- Nov 25, 2018
- 2 min read
Updated: Nov 27, 2018

विवेकानंद महाविद्यालयात भारतीय निवडणुक प्रक्रिया आणि धोरण निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी E&PRC (Electoral and Policy Research Cell) ची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर केंद्राच्या वतीने सेफ़ोलॉजी या विषयामध्ये दोन सर्टीफ़िकेट कोर्स आणि एक डिप्लोमा कोर्स सूरु करित आहोत. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार यापैकी कोणत्याही एका कोर्सची निवड करु शकतात. सेफ़ोलॉजी हा विषय आपल्याकडे नविन असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याविषयी माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी हा लेख सादर करित आहे. प्रस्तुत लेखात सेफ़ोलॉजी म्हणजे काय? या विषयाचे महत्व आणि पात्रता याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. याबद्द्दल विद्यार्थ्यांची काही शंका किंवा प्रश्न असतील तर राज्यशास्त्र विभागात संपर्क साधु शकतात.
Psephology(सेफ़ोलॉजी) काय आहे?
सेफ़ोलॉजी हि एक अशी ज्ञानशाखा आहे कि ज्यामध्ये निवडणुकांचा शास्त्रिय पद्धतीने अभ्यास केला जातो. या पद्धतीमध्ये गत निवडणुकांची आकडेवारी अभ्यासली जाते, तसेच वर्तमान काळातील मतदारांचा कल जाणुन घेण्यासाठी सर्वे केला जातो. या सर्वे मधुन जी माहिती प्राप्त होते त्या माहितीचे विश्लेषण करुन त्याआधारे अभ्यासपुर्ण निष्कर्ष काढ़ले जातात. आगामी निवडणुकांचा निकाल काय असेल याबाबत हे निष्कर्ष मार्गदर्शक ठरतात. जगातील अनेक विकसित लोकशाही देशांमध्ये ही पद्धत खुप लोकप्रिय झालेली आहे. भारतामध्येही या तंत्राचा वापर सुरु झालेला आहे.
महत्व
भारतासारख्या देशांमध्ये निवडणुकांचं एक वेगळं च महत्व दिसुन येतं. आपल्या देशात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दर पाच वर्षांनी आयोजित केल्या जातात. देशातील धार्मिक, जातिय, सांस्क्रूतीक भिन्नतेमुळे या निवडणुकांमध्ये कमालिची अनिश्चितता दिसुन येते. त्यातच आता मतदारांमधील जाग्रूतीमुळे कोणत्या उमेदवाराचा विजय होइल आणि कोणत्या पक्षाला जनतेचे स्पष्ट बहुमत प्राप्त होइल हे सांगणे कठिण बनले आहे. अशा परिस्थितीत सेफ़ोलॉजी या शाखेची भुमिका निर्णायक ठरते. निवडणुक प्रक्रियेच्या शास्त्रिय अध्ययनामूळे निवडणुक निकालाबाबतची संभाव्यता जाणुन घेता येते. निवडणुकांच्या काळात जवळपास सर्वच प्रसार माध्यमांमध्ये Pre-Poll आणि Exit-Poll द्वारे अंदाज प्रसारीत केले जातात. यात सर्वच प्रसारमाध्यमांचे अंदाज बरोबर येतात असे नाही. अर्थात यासाठी मतदार वर्तनाचा सर्वे करणे, मिळालेल्या माहितीचे पद्धतशीरपणे विश्लेषण करणे आणि त्याआधारे अभ्यासपुर्ण निष्कर्ष काढणे या पद्धतीचा अचुक अवलंब करावा लागतो. सेफ़ोलॉजी हे एक शास्त्र आहे आणि त्याचे अध्ययन शास्त्रिय पद्धतीनेच करावे लागते. यासाठी केंद्राच्या वतीने एका सखोल आणि परिपुर्ण अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली आहे. सदर अभ्यासक्रम पुर्ण केल्यास विद्यार्थ्यांची या क्षेत्रासाठी परिपुर्ण तयारी होईल.
पात्रता
या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी किमान पात्रता ही 10+2 म्हणजेच कोणत्याही शाखेतुन बारावी उत्तिर्ण असावा अशी आहे. या किमान पात्रते बरोबरच पुढिलप्रमाणे आवड असलेले विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अधिक उपयुक्त ठरेल.
1. असे विद्यार्थी ज्यांना राजकारणाची आवड आहे.
2. ज्यांना राजकारणामध्ये करियर करावेसे वाटते.
3. ज्यांना लोकांमध्ये मिसळण्याची आवड आहे आणि ज्यांचे संभाषण कौशल्य चांगले आहे ई.
वरिल प्रमाणे आवड आणि पात्रता असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेउ शकतात.
रोजगाराची संधी
हा अभ्यासक्रम पुर्ण केल्यास विद्यार्थ्यांना पुढिल क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होइल.
1. प्रसारमाध्यमे
2. राजकिय पक्ष किंवा राजकिय उमेद्वार
3. NGO
4. Survey Agencies ई.
या अभ्यासक्रमाचा डिप्लोमा कोर्स लवकरच सुरु करित आहोत. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स साठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी सर्वप्रथम राज्यशास्त्र विभागाच्या वेबसाईट वर E&PRC या लिंकवर जाउन ऑन लाईन नोंदणी करावी किंवा राज्यशास्त्र विभागात येउन नोंदणी करावी. केवळ मर्यादित जागेसाठी प्रवेश उपलब्ध आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करुन आपला प्रवेश निश्चित करावी.
Syllabus for Diploma Course : SYLLABUS
For registration Click here-- E&PRC
Opmerkingen