राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता या विषयावर आयोजित व्याख्यान
- Vivek Aware
- Sep 19, 2019
- 1 min read

राज्यशास्त्र विभागाने भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता या विषयावर दिनांक 18 सप्टेंबर 2019 रोजी व्याख्यान आयोजित केले होते. त्या व्याख्यानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. मोहम्मद उमर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये धर्मनिरपेक्षता ही संकल्पना विस्ताराने समजावून सांगितली.त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष संकल्पना ज्या देशात उदयास आली तेथील सामाजिक, राजकीय, धार्मिक ,सांस्कृतिक व आर्थिक इत्यादी घटक कसे जबाबदार होते. तसेच या संकल्पनेचा विकास युरोप किंवा पाश्चिमात्य देशाबाहेर कसा झाला व भारतीय राज्यघटना निर्मितीत या तत्वांचा कसा प्रभाव राहिला. तसेच 1976 च्या 42 व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत धर्मनिरपेक्षता या तत्वाचा अंतर्भाव होईपर्यंतच्या सर्व तपशीलावर प्रकाश टाकला. तसेच नंतरच्या काळात धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर विविध राजकीय पक्ष कसे राजकारण करतात याची मीमांसा केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुखव व उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शेजुळ यांनी केले. प्रास्ताविकामध्ये व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सत्यपाल कांबळे यांनी केले तर आभारप्रकटीकरण प्रा. दत्तात्रय लावंड यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील डॉ. सत्यपाल कांबळे, प्रा. विवेक आवारे, प्रा. दत्तात्रय लावंड, डॉ. दत्ता येरमुले प्रा. नामदेव खंदारे इत्यादींनी सहकार्य केले. तसेच इतर विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments