विवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित दोन दिवसीय शाहु व्याख्यानमाला
- Vivek Aware
- Feb 19, 2019
- 1 min read

विवेकानंद महाविद्यालयामध्ये दिनांक 18 फ़ेब्रुवारी आणि 19 फ़ेब्रुवारी दरम्यान दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेच्या प्रथम चरणी आयोजीत कार्यक्रमात शाहु चरित्रावर डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी आपले विचार मांडले. शाहु महाराज हे कर्तव्यदक्ष राजे असल्याने त्यांनी प्रजेशी व्यवहार करतांना समतेचे भान ठेवले. अशा प्रकारचे भान प्रशानातील अधिकार्यांनी ठेवुन प्रजेशी सौजन्याने वागले पाहिजे, असे मत साहित्यीक प्रल्हाद लुलेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शेजुळ होते. उपप्राचार्य दादाराव शेंगुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विवेक आवारे आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. विलास ठाले यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. दत्ता येरमुले यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या व्याख्यानमालेच्या द्वितीय चरणामध्ये दिनांक 19 फ़ेब्रुवारी 2019 रोजी शिवजयंती निमित्त “छत्रपती शिवाजी महाराजांवरील इतिहास लेखन” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रोफ़ेसर उमेश बगाडे प्रमुख व्याख्याते होते. प्रोफ़ेसर उमेश बगाडे यांनी शिवचरित्रावरिल इतिहास लेखनातील त्रुटींबाबत प्रखड शब्दात मत व्यक्त केले तसेच शिवचरित्राचे पुनर्लेखन ही काळाची गरज असुन अभ्यासक व संशोधकांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफ़ेसर शाम शिरसाठ होते. तसेच उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे, उपप्राचार्य डॉ. आर. बी. शेजुळ, उपप्राचार्य प्रा. शुभांगी गोडबोले आणि प्रबंधक श्री. पी. जे. मोरे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments