VIVEKANAND SHIKSHAN SANSTHA'S
VIVEKANAND ARTS, SARDAR DALIPSINGH COMMERCE AND SCIENCE COLLEGE
AURANGABAD
DEPARTMENT OF POLITICAL SCIENCE
ADVANCE STUDY FORUM
Forum Activities

शैक्षणिक वर्ष 2018-19 पासुन राज्यशास्त्र पदव्युत्तर विभागांतर्गत विद्यार्थी हिताला अनुसरुन Advance Study Forum या नावाने राज्यशास्त्राची एक प्रयोगशाळा सुरु केलेली आहे. या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुक्त चर्चेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. सदर प्रयोगशाळा आठवड्यातुन किमान एक दिवस आयोजित केली जाते. जिथे तत्कालीन राज्य, राष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय समस्यांवर चर्चा घडवुन आणली जाते. या चर्चेमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी या समस्यांवर आपले मत मांडतात. तत्कालिन राजकिय समस्यांचा राज्यशास्त्रातील संकल्पना तथा सिद्धांताच्या आधारे आढावा घेतला जातो. सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना या ज्ञानशाखेतील संकल्पना तसेच सिद्धांतांचे आकलन सुलभ होण्यास मदत होते. या उपक्रमाचा उद्देश्य हा पुढिल प्रमाणे आहे:
-
विद्यार्थ्यांना राज्यशास्त्रातील सिद्धांत व संकल्पनांचे आकलन सुलभ व्हावे व त्यांची प्रासंगिकता कशी आणता येइल हे जाणुन घेणे.
-
विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध विचार कौशल्य निर्माण करणे व कार्यकारण भाव जाणुन घेण्यास प्रेरित करणे.
-
विद्यार्थ्यांमध्ये राजकीय समस्या जाणुन घेण्याबाबत प्रगल्भतेने विचार करण्याची क्षमता निर्माण करणे आणि समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवणे
-
राजकीय परिपक्वता साधणे तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय ई. आंतरसंबंधांचा शोध घेउन त्यांच्या परिणामांचे विश्लेषण करणे.
-
विद्यार्थ्यांना राजकीय व्यवस्थेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी तयार करणे, राजकीय जाग्रुती, नेत्रूत्वाची उभारणी ई. माध्यमातुन लोकशाही प्रक्रिया गतीमान करण्यास मदत करणे
सदर प्रयोगशाळेमध्ये बी.ए. तसेच एम.ए. राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी सहभागी होउ शकतात. त्यासाठी सर्वप्रथम इच्छुक विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विभागात येउन नोंदणी करावी लागेल. सदर उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क आहे.