“विवेकानंद महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात राष्ट्रीय परिसंवादाचे यशस्वी आयोजन”
- Vivek Aware
- Dec 27, 2018
- 1 min read

विवेकानंद महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने दिनांक 26 डिसेंबर 2018 रोजी नामवंत अभ्यासकांना निमंत्रीत करुन “Caste Assertion in India: Democracy or Mobocracy’’ या विषयावर ‘गोलमेज परिषद’ स्वरुपात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली येथील प्रा. अमिताभ सिंग, मुंबई विद्यापीठातील डॉ. म्रुदुल निळे, आर. बी. आय. चे जनरल मॅनेजर देवेश लाल, आर. एस, टी, एम. नागपुर विद्यापीठातील डॉ. जितेंद्र वासनीक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रा. प्रशांत अम्रूतकर, डॉ. शुजा शाकीर, डॉ. नवनाथ आघाव, पुणे येथील प्रा. मुख्तार शेख व विविध महाविद्यालय विभागप्रमुख सामिल झाले होते.
परिसंवादात “जाती अस्मितेच्या राजकारणावर” विविध द्रूष्टीकोणातुन चर्चा करण्यात आली. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक शाम शिरसाठ आणि उपप्राचार्य व संयोजक डॉ. राजेंद्र शेजुळ यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. आर. शेंगुळे, प्राध्यापक व्रुंद व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सत्यपाल कांबळे, प्रा. विवेक आवारे, प्रा. डी. एस. लावंड, डॉ. दत्ता येरमुले व डॉ. व्ही. एन. ठाले यांनी परिश्रम घेतले.
Comments