मतदार जागृती अभियान
- Vivek Aware
- Dec 17, 2018
- 1 min read

औरंगाबाद, दिनांक 16/12/2018 रोजी विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया मधिल राज्यशास्त्र विभागांतर्गत पैठण तालुक्यातील गाढेगाव (पैठण) येथे मतदार जाग्रुती अभियानासह एका अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये महाविद्यालयातील बी. ए. आणि एम.ए. च्या विद्यार्थ्यांनी गावात लोकशाही आणि मतदानाचे महत्व पटवुन देण्यासाठी एक प्रभात फ़ेरी काढली. यासोबतच विद्यार्थ्यांनी घरो-घरी जाउन गावकऱ्यांना लोकशाहीचे आणि सदसदविवेक बुद्धिने मतदान करण्याचे महत्व पटवून दिले तसेच वय वर्षे 18 पुर्ण केलेल्या तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यात गावातील सरपंच मंजुळाताई रासकर आणि ग्रामसेवक श्री. एस. एस. इसलवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी त्यांच्या गावाबद्द्ल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच गावातील सर्व घटकांना सोबत घेउन गावाच्या समस्या सामोपचाराने सोडविण्याच्या त्यांच्या शैलीने विद्यार्थी प्रभावित झाले. शासनाच्या विविध योजना याच पद्धतीने सर्वांच्या सहभागातुन राबविल्या जातात. या कामात त्यांना प्रशासनाचे प्रतिनिधी या नात्याने ग्रामसेवकांचे देखिल सहकार्य मिळत असते. शासनाच्या विविध योजना गावात प्रभावीपणे राबविल्या जातात. मागासवर्गियांसाठी विहिर योजना, रमाई आवास योजना, शेती अवजार योजना, सुलभ शौचालय योजना व इतर योजना गावात यशस्वीपणे राबविल्या गेल्या आहेत. ग्रामसेवकांनी शासनाच्या विविध योजनांबाबत सकारात्मक मत मांडले मात्र त्याचबरोबर मिळणाऱ्या अपुऱ्या निधिबाबत खंत देखिल व्यक्त केली.
या उपक्रमात गावातील नागरिकांनी देखिल विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफ़ेसर शाम शिरसाठ, राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शेजुळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सत्यपाल कांबळे, प्रा. विवेक आवारे, डॉ. दत्ता येरमुले यांनी परिश्रम घेतले.
Comments