“सद्यकालीन राजकारण मुल्यहिन झालेले आहे” विवेकानंद महाविद्यालयात सुहास सरदेशमुख यांचे प्रतिपादन
- Vivek Aware
- Nov 23, 2018
- 2 min read
Updated: Nov 26, 2018

दिनांक 3 ऑक्टोबर 2018 रोजी विवेकानंद महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्याते म्हणुन राजकिय अभ्यासक श्री सुहास सरदेशमुख यानी महाराष्ट्राच्या राजकारणातील अंतरंग या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील राजकारण समजुन घेतांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच वास्ताविक राजकारणातील अंतरप्रवाह समजुन घेणे आवश्यक आहे. वरकरणी डावे आणि उजवे असे राजकारण मांडले जाते. परंतु राजकारणातुन मुल्ये हद्दपार होत आहेत व आता आर्थिक क्षेत्राने ती जागा घेतली आहे. ज्या प्रदेशाकडे आर्थिक सुबत्ता आहे तोच सत्तेच्या राजकारणाला नियंत्रित करत असतो व सत्तेमध्ये वर्चस्व ठेवत असतो. सहकारासारखे क्षेत्र श्रीमंताच्या हातात गेल्यामुळे सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे एकवटलेल्या आहेत. या अंतरप्रवाहातुन महाराष्ट्राच्या राजकारणात बलशाली नेत्रूत्वाचा उदय होउन सर्व राजकिय प्रक्रिया आर्थिक व प्रादेशिक अर्थकारणामुळे नियंत्रित झाली आहे. ज्या प्रदेशाचे अर्थकारण पक्के नाही मग तेथिल मागासलेपण दुष्काळ, जात, धर्म, गटबाजी, स्वार्थी राजकारण ई बाबीला वाव मिळत जातो. मराठवाड्यासारख़्या मागासलेल्या प्रदेशात अशा राजकारणाला खतपाणी दिले जाते व अशा मुद्द्याचे राजकारण चर्चेचा विषय ठरतो. म्हणुन राजकारणातील अंतरप्रवाह समजुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी राजकिय अर्थशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे मत त्यांनी मांडले आहे. आजच्या काळात या स्वार्थप्रेरित राजकारणामुळे बहुतेक सामाजिक चळवळी कालबाह्य झालेल्या असुन महिलांच्या न्यायहक्क व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव देखिल त्यांनी लक्षात आणुन दिले.

अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफ़ेसर डॉ. शाम शिरसाठ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील 1960 पासुन् चे प्रवाह विचारात घेत असतांना विस विस वर्षांचे विकास व राजकारणाचे ट्प्पे कसे बदलत आले आहे हे अंतरविद्याशाखीय द्र्ष्टीकोणातुन समजुन घेतले पाहिजे असे आव्हान केले. सध्याच्या राजकारणात जाती गट संघटना व पक्ष तर दुसरीकडे जातीविरहित मित्र गट, चळवळ गट व समुह ई. चा प्रभाव वाढत आहे ही निश्चितच सकारात्मक बाब असुन स्थित्यंतरणाच्या प्रक्रियेमध्ये हा दुसरा गट राजकारणाला नियंत्रित करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. बी. शेजुळ यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातुन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तर सुत्रसंचालन डॉ. सत्यपाल कांबळे यांनी व पाहुण्यांचा परिचय डॉ. दत्ता येरमुले यांनी व आभारप्रदर्शन डॉ. व्ही.एन. ठाले यांनी केले. कार्यक्रमास डॉ. श्री. डी. आर. शेंगुळे, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. प्रभाकर मोरे याची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. व्ही. बी. आवारे, प्रा. दत्ता लावंड आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.
Comments